logo

चिखली पंचायत समितीच्या लिपिकास ९ ह. ची लाच घेतांना रंगेहाथ पकडले.


मन्सूर शहा आयमा न्यूज (चिखली बुलढाणा.):-- चिखली पंचायत समिती मधील समाज कल्याण विभागाचे लिपीक रविंद्र हिम्मतराव भंडारे उर्फ राबडी यांना तक्रारदार शेतकऱ्याकडून गोठ्याचे बिल देण्यासाठी ९ हजाराची लाच घेतांना लाचलूचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. ही आरोपी कार्यवाही १४ मार्च रोजी ३.३० वाजेच्या सुमारास पं.स.च्या कार्यालयांत केली.
सविस्तर असे की, चिखली पंचायत समितीचे लिपीक रविंद्र भंडारे उर्फ रावडी यांच्याकडे समाज कल्याण, एमआरजी एस, आदी कामे सोपावली असल्याने त्यांनी पंचायत समितीच्या कार्यालयात एका हॉलमध्ये स्वतः चे कार्यालय बनविले आहे. ते नेहमी लोकांना उध्दट व आरेरावीची भाषा वापरत असत. अनेकदा काही शेतकऱ्यांना
होते. तक्रारदार शेतकऱ्याचा एमआरजीएस योजने मधून गोठा मंजूर झाला होता. त्यांनी गोठ्याचे बांधकाम पूर्ण करून एका वर्षापासून बिलासाठी लिपीक रविंद्र भंडारे उर्फ रावडी यांच्याकडे वांरवार चकरा मारत होते. अखेर त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने लिपिकास विश्वासात घेतले आणि बिल देण्यासाठी ९ हजार रुपये लिपीक देण्याचे कबूल केले. ठरल्या प्रमाणे पैसे आणून देतो असे म्हणून त्यांनी बुलढाणा लाचलुचपत कार्यालय गाठले आणि सर्व हकीकत सांगितली. त्यामुळे बुलढाणा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्याऱ्यांनी सापळा रचला. कार्यालयांत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक असल्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. त्यामुळे याच गर्दीचा फायदा घेवून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी लिपिकास ९ हजार रुपये घेतांना रंगेहाथ पकडले.

0
0 views